अनेकदा निर्माते काही तरी नवीन आणि मोठे करण्याच्या प्रयत्नात काही असे चित्रपट बनवतात, जे प्रेक्षनकांमध्ये लोकप्रिय तर होतात पण पुढे वर्षानुवर्षे त्यांना टीकेला सामोरे जावे लागते. आजवर बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगणार आहोत, जे आपल्या कंटेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. काहींवर धर्माची चेष्टा केल्याचा, तर काहींवर इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप होता.पण असे असूनही या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मात्र धुवाधार कमाई केली.
बॉलीवूडचे ते चित्रपट ज्यांनी उडवली धर्माची खिल्ली, इतिहासाशी केली छेडछाड पण तरीही कमवले छप्परफाड पैसे
मागील वर्षी 2023 मध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा 'ॲनिमल' चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होताच यावर लोकांनी आपले टीकास्त्र सोडले. या चित्रपटावर महिलांविरुद्ध हिंसाचार आणि द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र तरीही बॉक्स ऑफिसवर याने भरपूर कमाई केली. या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर 457.84 कोटींची कमाई केली होती
दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांचा 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट देखील यात सामील आहे. हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज करण्यात आला होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटावर बाजीराव पेशवे यांच्या वंशजांनी ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. या चित्रपटाचे बजेट 145 कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर याने 356.2 कोटींची कमाई केली होती
अक्षय कुमारचा 'ओएमजी' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने संवेदनशील मुद्देही मांडले, त्यामुळे काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. चित्रपटाचे बजेट 20 कोटी होते आणि बॉक्स ऑफिसवर 215 कोटींची कमाई केली होती
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा 2018 साली रिलीज झालेला 'पद्मावत' हा चित्रपटावर अनेक राजकीय वाद झाले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.चित्रपटाची कथा 14 व्या शतकातील हिंदू राणी आणि मुस्लिम शासकाची होती. चित्रपटावर इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप होता. या चित्रपटाचे बजेट 215 कोटी रुपये होते, ज्याने 585 कोटींची कमाई केली होती
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांचा 'द काश्मीर फाइल्स' त्याकाळी फार चर्चेत राहिला. या चित्रपटाची कथा 90 च्या दशकात काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित आहे. या चित्रपटावर मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. या चित्रपटाचे बजेट 20 कोटी असून त्याने 341 कोटींची कमाई केली होती