शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकू' असं म्हणत गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
Padma Awards 2026: उदय कोटक आणि सत्यनारायण नुवाल यांच्यासह ‘या’ प्रमुख उद्योगपतींना केले सन्मानित
“भाजपाने परवानगी दिली, तर यांचे (शिंदेसेना) नामोनिशाण संपवून टाकू. मी आज परत बोलतोय.” असा थेट इशारा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे. पण त्याचवेळी ” भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केलं. मनाला पटलं नसलं तरीही कार्यकर्त्यांनी सहन केलं. आम्ही पक्ष नेतृत्त्वाचा निर्णय मान्य केला. असही गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.
यापूर्वीही मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात महायुतीतीतल सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे, निवडणुकीनंतर ज्यांचे जास्त नगरसवेक निवडून येतील त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदाची वाटणी केली जावी, अशी माझी मागणी होती.” असही नाईक यांनी नमुद केलं.
यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितलं होतं. पण त्यांनी त्यावेळी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती. असंही नाईक म्हणाले.
दरम्यान, जागावाटपावेळी शिवसेनेकडून ५७ जागांची मागणी करण्यात आली होती. पण आम्ही २० ते २२ जागा देण्यासाठी तयार होतो. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होत्या. त्यानंतर त्यांनीही एबी फॉर्म भरले आणि आणि आम्ही भरले. त्यानंतर जे झालं ते चांगलच झालं. असा टोलाही नाईक यांनी लगावला. ठाण्यातील लोकांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. ठाण्यात भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचेले गेले, कल्याणमध्येही तसेच झाले, पण त्यानंतरही जे पक्षाला मान्य होतं. ते आम्ही मान्य केलं.
“भाजप हा शिस्तीचा पक्ष असून कार्यकर्त्यांनी आदेश पाळला असला तरी ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीत त्यांची परवड झाली आहे,” असे मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले. सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर ताकदीनुसार पदे मिळाली असती, असे वैयक्तिक मत मांडतानाच कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीतही पाळलेली पक्षशिस्त कौतुकास्पद असल्याचे नाईक यांनी नमूद केले.






