दिवाळीमध्ये अनेक लोक सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. दिवाळीमध्ये सोनं चांदीच्या वस्तू घेणे शुभ मानले जाते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा सोन्याचांदीच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. सर्वच महिला आणि मुलींना अंगठी घालायला खूप आवडते. हातामध्ये अंगठी घातल्यानंतर हात सुंदर आणि उठावदार दिसतात. या डिझाईन्सच्या अंगठ्या तुमच्या हातामध्ये उठून दिसतील. १ ते २ ग्रॅम वजनाच्या सुंदर अंगठ्या तुम्ही नेहमी घालण्यासाठी वापरू शकता.(फोटो सौजन्य-istock)
दिवाळीमध्ये खरेदी करा १ ग्रॅम सोन्याची सुंदर अंगठी
डायमंडची अंगठी घालायला सगळ्यांचं आवडते. या डिझाईनची डायमंड रिंग तुमच्या हातामध्ये उठून दिसेल.
ऑफिसला जाताना घालण्यासाठी किंवा पार्टीला जाताना घालण्यासाठी या डिझाईनची अंगठी बेस्ट पर्याय आहे.
रोजच्या वापरता किंवा कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी या डिझाईनच्या अंगठ्या अगदी उत्तम आहेत. सोन्यामध्ये तुम्ही फुलांची किंवा बारीक वेलीची डिझाईन असलेली अंगठी घेऊ शकता.
हल्ली कपल्स रिंगचा मोठा ट्रेंड आला आहे. शिवाय सोन्याचांदीच्या अंगठ्यांमध्ये कपल्स रिंग्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
ऑनलाईनसुद्धा अंगठ्यांच्या बऱ्याच डिजाईन्स उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या आवडीची डिझाईन निवडून सोनाराकडे बनवण्यास देऊ शकता.