टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज दुसरा मालिकेचा सामना रंगणार आहे. यासाठी भारताचा युवा संघ कॅप्टन सूर्यकुमार यादवसह पोर्ट एलिझाबेथला पोहोचला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना सेंट जॉर्ज ओव्हल स्टेडियम होणार आहे. भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला त्याच्या घरच्या मैदानावर ६१ धावांनी पराभूत केले आहे आणि आता भारताच्या संघाकडे या मालिकेत १-० अशी आघाडी आहे. आज या सामन्याआधी बीसीसीआयने सोशल मीडियावर भारताच्या संघाच्या खेळाडूंचे एअरपोर्टवरील फोटो शेअर केले आहेत यावर एकदा नजर टाका.
भारतीय क्रिकेटर्सचे डॅशिंग एअरपोर्ट लुक. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने शतक ठोकले आणि हे त्याचे सलग दुसरे शतक होते. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा टीम इंडियासाठी पहिल्या सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही. तर अर्शदीप सिंहने संघासाठी पहिल्या सामन्यात १ विकेट घेतला होता. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
टीम इंडियामधील नवे चेहरे रमनदीप सिंह आणि जितेश शर्मा अजुनपर्यत प्लेइंग ११ मध्ये जागा मिळाली नाही. पण रमनदीप सिंह हा काही वेळासाठी मैदानात आला होता यामध्ये त्याने अविश्वसनिय फिल्डिंग करत मेडल मिळवले. रमनदीप सिंह
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघामध्ये युवा खेळाडू यश दयालला संघामध्ये स्थान मिळाले आहे, परंतु अजून त्याला संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे आज त्याचे संघात पदार्पण होऊ शकते. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
पहिल्या सामन्यात रवी बिश्नोई ३ विकेट्स नावावर केले होते तर आवेश खान याने भारतीय संघासाठी दोन विकेट्स घेतले होते. दोघांनी सामान्यत कमालीची कामगिरी केली. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नाही पण तो टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. तर टिळक वर्माने पहिल्या सामन्यात महत्वाची खेळी खेळली. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया