आधी कोंबडी आली की अंड हा प्रश्न तुम्ही अनेकदा ऐकला असेल. काहींनी म्हटलं कोंबडी आधी आली तरी काहींनी म्हटलं अंड पहिली आली असे तर्क आजवर अनेकांनी लावले मात्र याचे योग्य उत्तर आजवर कोणीही देऊ शकलं नाही.
कित्येक वर्षांचं कोड सुटलं! आधी कोंबडी आली की अंड? वैज्ञानिकांना सापडलं उत्तर
कोंबडी आधी की अंड? पृथ्वाीवर सर्वात पहिले कोण आलं हा प्रश्न आपण वर्षानुवर्षापासून ऐकत आलो आहोत. याचे उत्तर आजवर कोणीही देऊ शकल नाही. मात्र आता वैज्ञानिकांना या प्रश्नाच उत्तर सापडलं आहे
या प्रश्नाबाबत अनेकांची वेगवेगळी मत आहेत. या प्रश्नाने अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण केला आहे. याबाबत प्रत्येकजण वेगवेगळे युक्तिवाद करत आहे
अखेर शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे. विज्ञानानुसार याचे उत्तर अंडी असे आहे. शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, लाखो वर्षांपूर्वी या जगात प्रथम अंडी आली. प्राणीशास्त्राचे रिपोर्टर आणि इनफाइनाइट लाइफचे लेखक, ज्यूल्स हॉवर्ड म्हणतात की, पहिले अंडे जीवनाच्या उत्पत्तीशी जोडलेले आहे.
डेली मेलच्या अहवालानुसार, अंडी प्रजातींच्या अस्तीत्वासाठी महत्त्वाची आहेत. कारण ते लाइफ सपोर्टींग कॅप्सूलसारखे कार्य करतात. ज्यामुळे अनुवांशिक विविधता सक्षम होते
कोंबडी किंवा अंडी? या प्रश्नाचे उत्तर अंडी हेच आहे. कोणत्याही प्रकारची पहिली अंडी सुमारे 600 दशलक्ष वर्षांपूर्वी विकसित झाली. प्रथम कडक कवच असलेली अंडी सुमारे 195 दशलक्ष वर्षांपूर्वी दिसली
कोंबडी फक्त 3,000 वर्षांपूर्वी उदयास आली. असे असले तरी प्रथम घरगुती कोंबडीचा जन्म कोंबडी-वन पक्षी संकरापासून झाला. म्हणजे पहिली कोंबडी आधी आली. त्यानंतर पहिली कोंबडीची अंडी आली