जगातील सगळ्यात सुंदर भावना म्हणजे आई होणं. गर्भधारणेच्या नऊ महिन्यांमध्ये सर्वच महिला स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेतात. कारण या दिवसांमध्ये शरीरात अनेक नवनवीन बदल होत असतात. या बदलांना सामोरे जाताना महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. याशिवाय नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये अनेकदा मूड स्विंग होणे, मूडमध्ये सतत बदल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
गरोदरपणात सतत मूड स्विंग होतो? मग रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
रोजच्या आहारात नियमित एक किंवा दोन अंडी खावीत. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी १२ आणि कोलीन शरीरासाठी आवश्यक ठरतात. त्यामुळे अंड्यांपासून तुम्ही बुर्जी किंवा ऑम्लेट बनवून खाऊ शकता.
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि मॅग्नेशियम आढळून येते. ज्यामुळे लगेच मूड सुधारतो आणि शरीरात वाढलेला तणाव कमी होतो. चॉकलेट खाल्यामुळे मेंदूमधील आनंदी हार्मोन्स वाढतात.
वर्षाच्या बाराही महिने बाजारात पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारते. याशिवाय पालेभाज्यांमध्ये असलेले घटक शरीरासाठी आवश्यक ठरतात.
काजू, बदाम, अक्रोड, मनुके इत्यादी ड्रायफ्रूटचे आहारात सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी रोज ड्रायफ्रूट खावे. यामुळे मूड सुधारून शरीरात वाढलेला तणाव कमी होतो.
गरोदरपणात कोणत्याही तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी एवोकॅडोचा आहारात समावेश करावा. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, फोलेट आणि विटामिन बी ६ इत्यादी घटक मूड सुधारण्यासाठी मदत करतात.