जांभळाचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला तुरट लागणारी जांभळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. उन्हाळयात बाजारात जांभळं उपलब्ध असतात. आकाराने लहान असलेल्या बारीक फळाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. बऱ्याचदा घरी जांभळं आल्यानंतर त्यातील बी काढून फेकून दिली जाते. मात्र जांभळाची बी फेकून देण्याऐवजी पावडर करून नियमित सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला जांभळाच्या बियांची पावडर खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
जांभळाच्या बिया निरुपयोगी म्हणून फेकून न देता नियमित करा सेवन
जांभळ्याच्या बियांची पावडर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी अतिशय प्रभावी आहे. या पावडरचे सकाळी उठल्यानंतर नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहील.
रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यात जांभळाच्या बियांची पावडर टाकून प्यावी. यामुळे शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात राहील आणि मधुमेहाचा धोका उद्भवणार नाही.
शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित तुम्ही जांभळ्याच्या पावडरचे सेवन करू शकता. यामुळे संपूर्ण बॉडी डिटॉक्स होईल आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
जांभळाच्या बियांच्या पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात. यामुळे शरीरातील हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होत नाही. कोमट पाण्यात तुम्ही पावडरचे नियमित सेवन करू शकता.
वाढलेले वजन कमी करताना अनेक पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन केले जाते. मात्र जांभळ्याच्या बियांच्या पावडरचे सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील. वाढलेले वजन नियंत्रणात राहील.