चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे थायरॉईड. शरीरात वाढलेल्या थायरॉईडच्या गाठी आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढणे, अचानक वजन वाढणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. (फोटो सौजन्य – iStock)
Thyroid पासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन,
हिरव्या पालेभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. बाजारात सर्वच प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.
सकाळी उठल्यानंतर नियमित एक सफरचंद खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही.
थायरॉईडची पातळी कमी करण्यासाठी कच्च्या खोबऱ्याचे आहारात सेवन करावे. यापासून तुम्ही खोबऱ्याचे लाडू किंवा जेवणातील इतर पदार्थ बनवू शकता.
विटामिन युक्त आवळ्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात आवळ्याची पावडर मिक्स करून पिऊ शकता.
थायरॉईड ग्रंथीचे योग्य कार्य होण्यासाठी आयोडीनची शरीराला जास्त आवश्यकता असते. त्यामुळे रोजच्या आहारात समुद्री मासे, अंडी आणि दहीइत्यादी पदार्थांचे भरपूर सेवन करावे.