निरोगी आरोग्यासाठी शरीरात असलेले सर्वच विटामिन अतिशय आवश्यक आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी १२. शरीरामध्ये विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळेअशक्तपणा, थकवा, अशक्तपणा, स्मरणशक्ती कमी होणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय शरीराला ऊर्जा मिळेल. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. (फोटो सौजन्य – iStock)
विटामिन बी १२ ची शरीरात निर्माण झालेली कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' ड्रिंक्सचे सेवन
शरीरातील कमी झालेले विटामिन बी १२ नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी रोजच्या आहारात बीटच्या रसाचे सेवन करावे. बीटचा रस आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे.
पालकामध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात आढळून येते. याशिवाय रोजच्या आहारात तुम्ही पालकच्या भाजीचे किंवा पालकच्या रसाचे सेवन करू शकता.
शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिन आणि विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित डाळिंबाच्या दाण्यांचा रस प्यावा.
सर्वच दुधांमध्ये विटामिन बी १२ आणि इतर पोषक घटक आढळून येतात. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी नियमित दूध प्यावे.
संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन बी १२ आढळून येते. याशिवाय यामध्ये विटामिन सी आणि इतर पोषक घटकसुद्धा असतात. शरीरात निर्माण झालेला थकवा अशक्तपणा दूर करण्यासाठी संत्र्याचा रस प्यावा.