शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर कमी वयातच सांधेदुखणे, हाडं दुखणे, कंबर दुखणे, हाडांचे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यानंतर हाडांचे दुखणे वाढू लागते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
कॅल्शियम वाढवण्यासाठी 'या' पेयांचे करा सेवन

दैनंदिन आहारात नियमित हळदीचे दूध प्यावे. हळदीचे दूध प्यावे. यामुळे शरीराचे कॅल्शियम वाढते. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते जे जळजळ कमी करण्यास मदत करते.

संत्र्याच्या रसामध्ये भरपूर कॅल्शियम आणि विटामिन सी असते. त्यामुळे तुम्ही संत्र्याचा रस नियमित पिऊ शकता. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

शरीरात कॅल्शियमची पातळी कमी झाल्यानंतर दैनंदिन आहारात बदाम पालकच्या स्मूदीचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. बदामामध्ये भरपूर कॅल्शियम असते. त्यामुळे कॅल्शियम वाढवण्यासाठी नियमित पालक बदाम स्मूदीचे सेवन करावे.

अननस आणि केळ्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. शिवाय यामध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम आढळून येतात, ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

अंजीरमध्ये भरपूर कॅल्शियम आढळून येते. पण आपल्यातील अनेकांना अंजीर खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही अंजीर स्मूदी बनवून पिऊ शकता. अंजीर स्मूदी बनवणे अतिशय सोपे आहे.






