सकाळी उठल्यानंतर अनेकांना रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. सतत चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात आम्ल्पित्ता वाढते आणि संपूर्ण दिवस खराब जातो. शरीरात वाढलेल्या आम्ल्पित्तामुळे गॅस, ऍसिडिटी किंवा वारंवार आंबट ढेकर येऊ लागतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोट आणि आतड्यांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर 'या' पदार्थांचे करा सेवन
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा तूप घालून सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर बदाम, अक्रोड, काजू, सुर्यफूल बिया किंवा चिया सीड्स खावे. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासोबतच केसांना सुद्धा अनेक फायदे होतात.
पपई, केळी, सफरचंद, संत्रं, डाळिंब इत्यादी हंगामी फळांचे सेवन केल्यामुळे शरीराचा विकास होतो. फळांच्या सेवनामुळे त्वचा सुधारते आणि शरीर कायमच हायड्रेट राहण्यास मदत होते.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आल्याच्या रसात हळद मिक्स करून प्यायल्यास मेटाबॉलिजम सुधारण्यास मदत होईल. यामुळे शरीरात वाढलेला थकवा कमी होतो,पोट स्वच्छ होते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
रोजच्या आहारात गाजर, शिमला मिरची, पालक, मशरूम किंवा टोमॅटो, अंडे, पनीर किंवा टोफू इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरात चांगल्या बॅक्टेरिया वाढू लागतात.