दैनंदिन आहारात सेवन केलेल्या गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे आहारात फळे, भाज्या इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर ते सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मानसिक तणाव वाढल्यानंतर डिप्रेशन, कामाचा ताण इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

बेरी हे बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं. त्यामुळे तुम्ही आहारात बेरीचे सेवन करू शकता. ब्लु बेरी, स्ट्रॉबेरी किंवा इतर फळांचे सेवन करू शकता.

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे फोलेट, मॅग्नेशियम आणि इतर जीवनसत्त्वे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

लहान मुलांसह मोठ्यानं सुद्धा चॉकलेट खाणे आवडते. चॉकलेट खाल्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते. त्यामुळे नियमित डार्क चॉकलेटचे सेवन करावे.

मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी आंबवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ खाल्यामुळे तणाव कमी होतो.

तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहारात सुकामेवा आणि बियांचे सेवन करावे. यामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. त्यामुळे आहारात या पदार्थाचे सेवन करावे.






