सूर्यकुमार यादव उद्या खेळणार की नाही? (फोटो- ians)
उद्या मुंबई इंडियन्स अन् आरसीबी येणार आमनेसामने
हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता कमी
सूर्यकुमार यादवकडे मुंबईचे नेतृत्व असण्याचा अंदाज
Tata IPL 2026 MI Vs RCB Updates: आयपीएलचा थरार रंगात आला आहे. शेवटच्या टप्प्यात चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. दरम्यान उद्या रविवार असल्याने आयपीएलमध्ये डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. त्यातील उद्या संध्याकाळी एक महत्वाचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने येणार आहेत. मात्र सूर्यकुमार यादव उद्या खेळणार की नाही याबाबत आता माहिती समोर येत आहे.
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या पत्नी देविशा यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघासोबत उपलब्ध नव्हते. त्यामुळे उद्या सूर्यकुमार उद्या खेळणार की नाही याबाबत माहिती समोर येत आहे.
गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतीमुळे उद्याच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्याचे मुंबईच्या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार होता. मात्र त्याला अचानक घरी जावे लागले असल्याचे उद्या तो खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर समोर आलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव उद्या आरसीबीविरुद्ध खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल होण्याचा अंदाज आहे.
Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन
आयपीएल सुरू असतानाच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा यांना कन्यारत्न झाले आहे. सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले आहेत. सूर्यकुमार यादवने ही गोड, आनंदाची बातमी सोशल मिडियावरून शेअर केली आहे. सूर्यकुमार यादव आणि देविशा यांचे 2016 मध्ये लग्न झाले आहे. आता त्यांच्या कुटुंबात एका गोंडस परीचे आगमन झाले आहे. त्याने ही बातमी शेअर केली आहे. चाहत्यांकडून सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पत्ता कट! Hardik Pandya मुंबई पलटणमध्ये नसणार? RCB विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात…
Hardik Pandya मुंबई पलटणमध्ये नसणार?
हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्याने मागील सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यावेळेस सूर्यकुमार यादवने मुंबईचे नेतृत्व सांभाळले होते. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. हार्दिक अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.






