फोटो सौजन्य - Social Media
एका मुलाखतीत सचिन पिळगावकरांना सध्याच्या PVR मध्ये वापरण्यात येणारे Recliner Seats की सिनेमागृहातील जुन्या खुर्च्या? याबाबत प्रश्न केला गेला. तेव्हा सचिन पिळगावकरांनी सिनेमागृहातील जुन्या खुर्च्यांना प्राधान्य दिले तसेच Recliner Seats का नको? याबाबत उत्तरही दिले.
सचिन पिळगावकर म्हणतात “जेव्हा आपण सिनेमागृहात एखादा सिनेमाची मज्जा घेण्यासाठी जातो. तेव्हा तुम्ही नेहमी सरळ बसले पाहिजे. गाणे सुरु झाले की तुम्हाला अंग थिरकवता आले पाहिजे. सिनेमात विनोद झाला की पोट धरून लोटपोट होता आले पाहिजे, या सगळ्या गोष्टी Recliner Seats मध्ये शक्य नाही.” एकंदरीत त्यांचे म्हणणे आहे की Recliner Seats वर बसून चित्रपटाची मज्जा घेता येत नाही. आपण Recliner Seats वर बसायला हॉस्पिटलमध्ये नाही आलोत, आपण सिनेमागृहात आलो आहोत.
जेव्हा मुलाखतदार सचिन पिळगावकरांना प्रश्न करतो की, “Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?” तेव्हा सचिन पिळगावकर तांत्रिकदृष्टया काय योग्य? त्यावर जास्त लक्ष देताना दिसले. सचिन सांगतात की मध्यभागी बसने सगळ्यात योग्य आहे. जर Theater मध्ये Atmos आहे तर थोड्या पुढच्या बाजूला बसलात तर योग्य आहे आणि 5.1 किंवा 7.1 असेल तर अगदी शेवटी बसलात तरी काय हरकत नाही.
विविध विधानांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होणारे पिळगावकर त्यांच्या या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यंदा ट्रोलिंग झाली नाही. त्यांच्या चाहत्यांना त्यांची यंदाची विधाने पटली आहेत याचे पुरावे कमेंट्समध्ये दिसून येत आहेत.






