कायम निरोगी राहण्यासाठी शरीरात सर्वच विटामिनची पातळी एकसमान असणे आवश्यक आहे. कारण शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरासाठी प्रोटीन अतिशय महत्वाचे आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा, हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. (फोटो सौजन्य – istock)
protein ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच राजमा खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आहारात राजम्याचे सेवन करावे. यामुळे प्रोटीनची कमतरता भरून निघेल.
घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी नेमकं काय बनवावं, बऱ्याचदा लवकर सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मटार पुलाव बनवू शकता. हा पदार्थ कोशिंबीरसोबत अतिशय सुंदर लागेल.
शाहाकारी लोकांसाठी प्रोटीनचा महत्वाचा स्रोत म्हणजे पनीर. पनीर खाल्ल्यामुळे शरीरात मुबलक प्रमाणात प्रोटीन वाढते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
आजारी पडल्यानंतर किंवा हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास मुगाच्या डाळीची खिचडी बनवून खाल्ली जाते. मुगाची डाळ सहज पचन होते आणि चवीला सुद्धा सुंदर लागते.
प्रोटीन वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात मुगाच्या डाळीचा चिला खावा. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता.