संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्याला हिंदू नवीन वर्ष सुरु होते. सणावाराच्या दिवसांमध्ये अंगणात रांगोळी काढली जाते. याशिवाय दाराच्या समोर गुढी उभारून गुढीची पूजा केली जाते. सणाच्या दिवसांमध्ये अंगणात रांगोळी नसेल तर सणवार पूर्ण झाल्यासारखे वाटतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुढीपाड्व्यासाठी अंगणात रांगोळी काढण्यासाठी काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्सची रांगोळी अंगणात काढल्यास अंगण अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसेल.(फोटो सौजन्य – pinterest)
गुढी पाडव्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी दारात काढा 'या' सुंदर डिझाइन्सची रांगोळी
कमीत कमी वेळात जर तुम्हाला साधी सोपी रांगोळी काढायची असेल तर तुम्ही या डिझाइन्सची रांगोळी काढू शकता. यामध्ये तुम्ही मराठमोळी नथ काढून आजूबाजूला डिझाइन्स काढू शकता.
अंगणामध्ये जास्त जागा उपलब्ध असल्यास मोठ्या जागेमध्ये ही डिझाईन सुंदर वाटेल. रांगोळी काढून तुम्ही त्यात मराठी अक्षरांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकता.
वेगवेगळ्या रंगाचा वापर करून तुम्ही या डिझाईनची सुंदर आणि उठावदार रांगोळी काढू शकता. रांगोळीमधील वेगवेगळे रंग अतिशय आकर्षित दिसतात.
संस्कारभारती रांगोळी अंगणात अतिशय खुलून दिसते. सर्वच सणाच्या दिवशी दारासोमोर आणि मोठ्या अंगणात रांगोळी काढली जाते. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या फुलांचा आकार आणि रंगाचा वापर करून या पद्धतीची सुंदर रांगोळी काढू शकता.
अनेकांच्या अंगणात रांगोळी काढण्यासाठी जागा नसते. त्यामुळे तुम्ही कमीत कमी जागेमध्ये गुढीचे चित्र काढून सुंदर रांगोळी काढू शकता.