तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. अहिंसेचा मार्ग दाखवणारे गौतम बुद्धांचे विचार आजच्या काळातही लागू होतात. बुद्धांचा फोटो असो किंवा त्यांची मूर्ती डोळे बंद आणि ध्यानस्त अशीच त्यांची प्रतिमा असते. त्याचबरोबर बुद्धांची लक्षवेधी प्रतिमा ठरते ती त्यांच्या केसांमुळे.

गौतम बुद्धांचे केस खरच कुरळे होते का ? तर या प्रश्नाचं उत्तर काही जाणकार नाही असं देतात.

काही जाणकरांच्या मते असं सांगितलं जातंं की, एकदा भर उन्हात बुद्ध तपश्चर्येला बसले होते त्यावेळी प्रखर उन्हाने त्यांच्या डोक्याला त्रास होत होता.

त्यावेळी उन्हाच्या झळा त्यांना बसू नयेत म्हणून गोगलगाय बुद्धांना थंडावा मिळावा यासाठी त्यांच्यावर डोक्यावर चढली.

एक म्हणता म्हणता अशा 108 गोगलगाय त्यांच्या डोक्यावर चढल्या. बुद्धांना तपश्चर्या करता यावी यासाठी त्या 108 गोगलगायींनी प्राणांचा त्याग केला.

त्यांच्या स्मरणार्थ गौतम बुद्धांच्या प्रत्येक प्रतिमेत दिसणारे त्यांचे कुरळे केस नाही तर त्या गोगलगाय आहेत असं म्हटलं जातं.






