बाजारातून विकत आणलेल्या भाज्या काही घरांमध्ये स्वच्छ घेतल्यानंतर कापून फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. मात्र कापून ठेवलेल्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवून काही वेळाने सेवन केल्यास आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. भाज्या अधिककाळ चांगल्या टिकून ठेवण्यासाठी त्या फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. पण फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या आरोग्यासाठी विष ठरू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या भाज्या कापून फ्रिजमध्ये ठेवू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
कापलेल्या 'या' भाज्या चुकूनही ठेवू नका फ्रिजमध्ये

मुळा भाजी कापून कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे मुळ्याच्या भाजीला अतिशय घाणेरडा वास येऊन भाजी खराब होण्याची शक्यता असते. तसेच बाजारातून विकत आणलेल्या कोणत्याच भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नये.

दुधी भोपळ्याचे लहान लहान तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले जातात. मात्र फ्रिजमध्ये कापून ठेवलेला भोपळा काळा पडून खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजमध्ये कधीच भोपळा कापून ठेवू नये.

कांदा फ्रिजमध्ये कापून ठेवल्यानंतर कांद्याला वास येऊ लागतो. त्यामुळे चुकूनही बारीक चिरून ठेवलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवू नये. या कांद्याचा जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी वापर करावा.

दैनंदिन आहारात टोमॅटोचा वापर केला जातो. मात्र भाजी किंवा डाळ बनवताना टोमॅटो शिल्लक राहिल्यानंतर तो फ्रिजमध्ये ठेवला जातो. पण असे न करता टोमॅटो बाहेर ठेवावा. फ्रिजमध्ये कापून ठेवलेल्या टोमॅटोला दुर्गंधी येण्याची शक्यता असते. याशिवाय त्यातील पाणी कमी होऊन टोमॅटो हळूहळू खराब होऊ लागतो.

सलगम भाजी कापून फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे चव सुद्धा कमी होते. दैनंदिन आहारात स्वच्छ आणि फ्रेश भाज्यांचे सेवन करावे. खराब झालेल्या भाज्यांचे सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.






