दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. पण शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. शरीरात पोटॅशियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांमध्ये वेदना होणे, नसांमध्ये वाढलेल्या वेदना, हृदयाच्या कार्यात अडथळे इत्यादी समस्या उद्भवून आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटॅशियमचे कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा 'या' पदार्थांचे नियमित सेवन
आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा काबुली चण्याची भाजी खावी. या भाजीमध्ये असलेले घटक शरीराला पोषण देतात. काबुली चण्यांमध्ये भरपूर पोटॅशियम आढळून येते.
बेचव चवीचे एवोकॅडो कोणालाच खायला आवडत नाही. पण तुम्ही एवोकॅडो टोस्ट किंवा एवोकॅडो स्मूदी बनवून पिऊ शकता. एवोकॅडोपासून रेसिपी बनवताना त्यात वेगवेगळे पदार्थ टाकावेत.
शरीरात निर्माण झालेली पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी पालकच्या भाजीचे सेवन करावे. पालक पनीर, पालक सूप, पालक पराठा इत्यादी पदार्थ खावेत.
मांसाहारी पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही सॅल्मन माशांचे आहारात सेवन करू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते.
पोटॅशियमने समृद्ध असलेली केळी नियमित खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. याशिवाय आरोग्य सुधारण्यास मदत होईल. केळी हे फळ स्टार्चयुक्त कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखरेचा समृद्ध स्रोत मानले जाते.