राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्यांचे सेवन करू नये, असा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. फळे खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सकाळच्या नाश्त्यात ताज्या फळांचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. पण पावसाळ्यात ओलावा आणि घाणीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढू लागतात. हेच बॅक्टरीया फळांवर जमा होतात. त्यामुळे अन्नपदार्थांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये बाहेर कापून ठेवलेली किंवा जास्त पाणी असलेले फळे खाऊ नयेत. यामुळे पोटात दुखणे किंवा पोटात विषाणू वाढण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरीचे सेवन करू नये. या फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. बेरिजमध्ये जास्त पाणी असते, त्यामुळे या फळांवर लवकर बॅक्टेरिया वाढू लागतात. तसेच अन्नपदार्थांमधून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. कलिंगडमध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड लवकर खराब होण्याची शक्यता असते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही आंब्याचे सेवन करू नये. आंब्याचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पोटात जडपणा, गॅस आणि अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
पीचमध्ये असलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे हे फळ अतिशय मऊ होऊन लवकर खराब होऊन जाते. तसेच या फळाला सहज बुरशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पीच खाऊ नये.
काकडीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी असलेल्या फळांचे किंवा भाज्यांचे अजिबात सेवन करू नये. यामुळे शरीराला हनी पोहचण्याची शक्यता असते.