सध्या वेळ वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं विमानाने प्रवास करतात. ट्रॅफिकची कटकट आणि ट्रेनचे धक्के खाण्यापेक्षा अनेकांना विमानाने प्रवास करणं सोयीचं वाटतं. अनेकांसाठी विमान प्रवास हा त्यांच्या रोजच्या जिवनाचा भाग बनलेला आहे. पण विमानप्रवासा दरम्यान काही नियमाचं पालन करणं देखील गरजेचं आहे. आपण विमानातून प्रवास करताना आपल्यासोबत कोणत्या वस्तू घेऊन जात आहोत, याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण विमान प्रवासादरम्यान काही गॅझेट्सवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही तुम्ही हे गॅझेट्स प्रवासादरम्यान कॅरी केले तर तुम्हाला शिक्षा भोगावी लागू शकते. (फोटो सौजन्य – pinterest)
हवामान बदलाचा विमान सेवेला फटका; फेब्रुवारीत विमान रद्द होण्याचे प्रमाण 21 टक्क्यांवर
ई-सिगारेट - विमान प्रवासादरम्यान ई-सिगारेट बाळगण्यावर बंदी आहे. कारण यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो, तसेच आग लागण्याची देखील शक्यता असते.
Samsung Galaxy Note 7 - Samsung Galaxy Note 7 च्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे विमान प्रशासनाने प्रवासात Samsung Galaxy Note 7 वर बंदी घातली आहे.
हाय-पावर्ड लेजर प्वाइंटर्स - तुम्ही विमान प्रवासादरम्यान हाय-पावर्ड लेजर प्वाइंटर्सचा वापर करू शकत नाही, कारण यामुळे वैमानिकाचे लक्ष विचलित होऊ शकतं.
स्पेअर लिथियम बॅटरीज - स्पेअर लिथियम बॅटरीजमुळे आग लागण्याची शक्यता असते. यामुळे विमान प्रवासादरम्यान यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पोर्टेबल चार्जर - अनेक विमान कंपन्यानी पोर्टेबल चार्जरवर बंदी घातली आहे. पोर्टेबल चार्जरमधील लिथियम बॅटरीमुळे आग लागू शकते.
स्टन गन किंवा टेसर गन - स्टन गन आणि टेसर गन सारख्या स्व-संरक्षण गन देखील विमान प्रवासादरम्यान सोबत नेण्यास मनाई आहे.