जगभरात लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबीचा थर जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे आहारात सेवन केले जाते. पण चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना कोणत्या पांढऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्याऐवजी आणखीनच वाढण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – istock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका 'या' पांढऱ्या पदार्थांचे सेवन
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करताना आहारात साखरेचे अजिबात सेवन करू नका. यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीरातील कोणत्याही अवयवाला धोका निर्माण होऊ शकतो.
प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात भात खाल्यास पोटावर चरबीचा घेर वाढण्यासोबत रक्तातील साखरसुद्धा वाढते. त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी अजिबात भात खाऊ नये.
काहींना सतत प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे किंवा जंक फूडचे सेवन करण्याची सवय असते. वजन कमी करताना आहारात मैद्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये.
वजन कमी करताना पौष्टिक आणि संतुलित अन्नपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारात कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास महिनाभरात वजन कमी होईल.
शरीराला विश्रांतीची खूप जास्त गरज असते. अपुऱ्या झोपेमुळे शरीराची पचनक्रिया बिघडते आणि वजन वाढू लागते. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे.