पावसाळा ऋतूला सगळीकडे सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरणात सतत होणारे बदल, दूषित पाणी, उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. साथीच्या आजारांची शरीराची लागण झाल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा किंवा वारंवार चक्कर येण्यास सुरुवात होते. अशावेळी आहारात या फळांच्या रसाचे सेवन करावे. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात फळांच्या रसाचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात शरीराची immunity वाढवण्यासाठी नियमित प्या 'या' फळांचे रस
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार सगळीकडे पसरू लागतात. या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. अशावेळी किवीच्या रसाचे सेवन करावे. किवी खाणे आरोग्यासाठी गुणकारी आहे.
अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेली चेरी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध असते. चेरीच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच यामध्ये जीवनसत्त्वे अ, ब, क, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
आपल्यातील अनेकांना गाजर खायला आवडत नाही. मात्र गाजर खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा गाजरच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
बीट आणि सफरचंदाचं रस नियमित प्यायल्यास आरोग्यासोबतच त्वचेला अनेक फायदे होतील. त्वचा कायमच उजळदार आणि निरोगी राहील. विटामिन ए, सी आणि बी६ ची कमतरता भरून निघेल.
विटामिन सी युक्त आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. आवळ्यामध्ये असलेले इतर गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती कायमच निरोगी ठेवतात.