भारतासह जगभरात सगळीकडे मोठ्या संख्येने चहाप्रेमी आहे. अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. तर काही लोक दिवसभरात ५ ते ६ वेळा चहाचे सेवन करतात. पण नेहमी नेहमी तोच दुधाचा चहा पिऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सुंगंधी फुलांचा वापर करून चहा बनवू शकता. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुले सहज उपलब्ध होतात. फुलांच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरसंबंधित वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कोणत्या सुंगधी फुलांच्या चहाचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या वेळी प्या 'या' सुंगंधी फुलांचा चहा

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून चहा बनवला जातो. या चहाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. घसा खवखवणे, जळजळ इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुलाबाचा चहा प्यावा.

शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी चमेलीच्या चहाचे सेवन करावे. चमेलीच्या फुलांचा वापर करून हा चहा बनवला जातो.

गोकर्णाच्या फुलांचा वापर चहा बनवण्यासाठी केला जातो. या चहाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

कॅमोमाइल फुलांच्या चहाचे नियमित सेवन केल्यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मदत होते. मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कॅमोमाइल फुलांच्या चहाचे सेवन करावे.

जास्वदींच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी जास्वदींच्या फुलांचा चहा प्यावा.






