जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूण वापरली जाते. लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. जेवणात लसूण टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होते. नियमित सकाळी उपाशी पोटी एक पाकळी लसूण चावून खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तर जाणून घेऊया उपाशी पोटी लसूण चावून खाल्यास शरीराला नेमके कोणते फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)
हृद्य आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमित खा एक पाकळी लसूण
लसूण खाल्यामुळे शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. उच्च रक्तदाब किंवा शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही नियमित एक पाकळी लसूण खाऊ शकता.
लसूणमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ल्झायमर आणि डिमेंशिया सारख्या मेंदूशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी लसूण प्रभावी ठरते.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सकाळी एक पाकळी लसूण चावून खावी. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आतड्यांतील निरोगी बॅक्टेरिया वाढू लागतात आणि पचनक्रिया सुधारते.
लसूणमध्ये अॅलिसिनमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात. यामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो.