आंबट गोड चवीची संत्री सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये संत्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. संत्र्याचा रस किंवा मिठाई आवडीने खाल्ली जाते. संत्रींमध्ये असलेले विटामिन सी त्वचा कायमच निरोगी आणि चमकदार होते. शरीरचू कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संत्र्याचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. संत्रीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. (फोटो सौजन्य – istock)
वातावरणातील बदलांमुळे कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित खा संत्री

एका संत्रींमध्ये अंदाजे ७०-९० मिलीग्राम विटामिन सी आढळून येते. दैनंदिन आहारात कायमच विटामिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरात पांढऱ्या पेशी वाढतात.

त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी नियमित एक संत्र खावे. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग नष्ट होऊन त्वचा अतिशय चमकदार होते. संत्र्यांमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करते.

संत्रीमध्ये फायबर, पोटॅशियम, विटामिन सी आणि कोलीन इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात. हे सर्व घटक हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.

बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि आतड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी संत्र्याचा रस किंवा नियमित एक संत्र खावे. यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते.

संत्र्यांमध्ये फ्रुक्टोज आणि कार्बोहायड्रेट्स आढळून येते, यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. उच्च फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.






