बाहेरील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो. वाढत चालली वायू प्रदूषण, सतत धूम्रपान करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यामुळे फुफ्फुसांसंबधित अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. फुफ्फुसांमुळे शरीरात असलेल्या सर्व रक्तपेशींना आणि इतर पेशींना ऑक्सिजन मिळते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
फुफ्फुसांचे नुकसान होऊ नये म्हणून आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
फुफ्फुसांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी आहारात टोमॅटोचे सेवन करणे. टोमॅटो तुमची कच्चा सुद्धा खाऊ शकता. यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारेल.
लोहयुक्त बीटरूटचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फुफ्फुसांमधील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी आणि फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी बीटरूट किंवा बीटरूटचा रस प्यावा. यामुळे फुफ्फुस डिटॉक्स होण्यास मदत होते.
मधामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिक्स करून प्यावे.
हळदीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आणि ऑक्सिजन फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. फुफ्फुसांमध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी आहारात हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे फुफ्फुस डिटॉक्स होतात.
चवीला आंबट गोड अननस सगळ्यांचं खूप आवडते. तसेच यामध्ये ब्रोमेलेन नावाचे एंजाइम आढळून येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा अननसचा रस प्यावा.