जगभरात कोकणी पदार्थ खूप फेमस आहेत. कोकणात बनवला जाणारा प्रत्येक पदार्थ आपुलकेने आणि प्रेमाने बनवला जातो. कमीत कमी साहित्यात बनवले जाणारे पदार्थ चवीला अतिशय सुंदर असतात. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर हे पदार्थ नक्की ट्राय करून पहा. हे पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणांपर्यंत सगळेच पदार्थ जेवणाची चव वाढवतात. चला तर पाहुयात कोकणातील पारंपरिक पदार्थांची नावे. (फोटो सौजन्य – pinterest)
कोकणातील अस्सल पारंपरिक पदार्थांनी वाढवा जेवणाची चव! जगभरात आवडीने खाल्लेले जातात 'हे' पदार्थ

खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जेवणानंतर सोलकढी प्यायली जाते. सोलकढीशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. कोकम आणि खोबऱ्याच्या दुधापासून बनवलेली सोलकढी नियमित प्यायल्यास अन्नपदार्थ सहज पचन होतात.

प्रत्येक घरात तांदळाच्या पिठाचा वापर करून मऊसूत घावणे बनवले जातात. धावणे आणि चटणी हे कॉम्बिनेशन कोकणात सगळीकडेच पाहायला मिळेल. धावणे सहज पचन होतात. याशिवाय बनवण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही.

कोकणात अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेला खरवस. गाईच्या चिकापासून बनवलेला खरवस सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो.

कुळीथ दाण्यांच्या पिठाचा वापर करून बनवलेली कुळीथ पीठ गरमागरम भातासोबत आवडीने खाल्ली जाते. जेवणात जर कुळीथ पिठी, गरमागरम भात आणि भाजलेला सुका मासा असेल तर चार घास जास्त जातात.

कोकणी लोकांचे आवडते पदार्थ म्हणजे मासे. जेवणाच्या ताटात कायमच माशांपासून बनवलेले पदार्थ असतात. मालवणी पद्धतीमध्ये बनवलेले चिकन वडे जगभरात फेमस आहेत.






