चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळवंडलेली दिसते? मग 'या' पद्धतीने करा बेसन पिठाचा वापर, चेहरा होईल तेजस्वी
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे अंगाची काहिली होते. याशिवाय घामामुळे कपडे अंगाला चिकटून राहतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. कामानिमित्त उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा काळवंडून जाते. चेहऱ्यावर टॅनिंग वाढते आणि त्वचा काळी दिसू लागते. याशिवाय शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पिंपल्स, ऍक्ने आणि मोठे फोड येतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर वेळीच दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करावेत. . भजी, वडा, पापडी इत्यादी तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर फोड्या येतात. या फोड्या हळूहळू मोठ्या झाल्यानंतर त्यांचे काळे डाग पडतात. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग किंवा त्वचेच्या इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करतात. पण यामुळे त्वचेचे नुकसान होते.(फोटो सौजन्य – istock)
The Body Shop : द बॉडी शॉपसोबत होळीमध्ये मिळवा निरोगी आणि तेजस्वी त्वचा!
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग किंवा त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन पिठाचा वापर करतात. बेसन पिठात असलेले गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात. त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन पिठाचा फेसमास्क बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार दिसेल आणि चेहऱ्यावर ग्लो येईल. चला तर जाणून घेऊया बेसनाचा फेसमास्क बनवण्याची सोपी कृती.
बेसन पिठाचा वापर करून जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्याप्रमाणेच बेसन पीठ त्वचेसाठी सुद्धा वरदान ठरते. वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात दुधावर येणारी जाड साय टाकून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या. बेसनाचा फेसमास्क लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने कोरडी करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून घ्या. यामुळे त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी नष्ट होण्यास मदत होईल. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यास बेसन पिठाचा वापर करावा.
जर तुमची त्वचा खूप जास्त तेलकट असेल तर बेसन पिठात गुलाब पाणी मिक्स करा. गुलाब पाणी चेहऱ्यावर वाढलेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मदत करते. चेहऱ्यावर हलकासा मसाज करून झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी होण्यासोबतच त्वचा आतून स्वच्छ आणि हायड्रेट राहील. उन्हामुळे वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बेसन पिठात लिंबाचा रस आणि दही घालून पेस्ट तयार करावी. यामुळे टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार होण्यास मदत होईल. तसेच तुम्हाला जर वारंवार पिंपल्स येत असतील तारे बेसन पिठात कडुलिंबाची पावडर मिक्स करून लावावी.






