पूर्वीच्या काळी महिला वेगवेगळ्या धातू, मोती, रत्न, सोनं, चांदीपासून बनवले जायचे. भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना विशेष महत्व आहे.महिलांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले दागिने परिधान केले जायचे. दागिन्यांना फार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्रातील दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कलाकुसर, आकर्षक डिझाइन्स आणि पारंपारिकता इत्यादी गोष्टींचा वारसा जपून तयार केले जातात. हल्ली सर्वच महिला लग्न समारंभ, सणवार, कार्यक्रमात पारंपरिक दागिने घालणे जास्त पसंत करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक दागिन्यांबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
'हे' पारंपरिक मराठमोळे दागिने कोणत्याही साडीवर दिसतील अतिशय सुंदर

ठुशी दागिने सोन्याचे बारीक मणी एकत्र गुंफून तयार केला जातो. यासोबतच ठुशीच्या मध्यभागी कमळाच्या आकारातील मणी किंवा पेंडेंटन्ट लावले जाते. नऊवारी आणि सहावारी साडीवर ठुशी दागिना अतिशय सुंदर दिसतो.

लहान मोठ्या आकारातील नाजूक मोत्यांचा वापर करून नथ तयार केली जाते. नथ हा दागिना नाकामध्ये घातला जातो. ब्रम्हणी नथ, पुनी नथ, कोल्हापुरी नथ, चंद्रकोर नथ इत्यादी अनेक वेगवेगळे नथीचे प्रकार आहेत.

कानात घातले जाणारे झुमका हा पारंपरिक दागिना आहे. झुमके साधारणपणे सोन्याचे, चांदीचे, किंवा मोत्यांचा वापर करून बनवले जातात. हल्ली सर्वच महिला झुमके घालण्यास पसंती दर्शवतात.

हातामध्ये घातल्या जाणाऱ्या तोड्यानां फार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. भारतीय उपखंडात ५००० वर्षांपूर्वीपासून महिला हातांमध्ये तोडे परिधान करत होत्या. सिंधु संस्कृतीच्या उत्खननात हरप्पा आणि मोहेनजोदडो येथे मिळालेल्या बांगड्यांच्या अवशेषांनी हे सिद्ध केले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात बोरमाळीला विशेष महत्व आहे. बोरमाळ परिधान केल्यानंतर पारंपरिक लुक दिसतो. हा दागिना ग्रामीण भागात खूप जास्त प्रसिद्ध आहे.






