एप्रिल मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त असतात. दोन महिने आधीपासूनच लग्नाची तयारी केली जाते. साड्या, दागिने, लेहेंगा इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. हल्ली सर्वच मुली लग्नात मोठ्या हौसेने लेहेंगा, घागरा किंवा साऊथ इंडियन पद्धतीचा लेहेंगा घालतात. मात्र लेहेंगा परिधान करताना त्यावर नेमकी कशा पद्धतीने ओढणी ड्रेप करावी? असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लेहेंगा परिधान केल्यानंतर त्यावर कशा पद्धतीने ओढणी किंवा दुप्पटा ड्रेप करावा, याच्या सोप्या पद्धती सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये लेहेंगा ड्रेप केल्यास लग्नात तुम्ही आकर्षक आणि उठावदार दिसाल.(फोटो सौजन्य – iStock)
लेहेंगा किंवा घागऱ्यावर 'या' पद्धतीने ड्रेप करा दुप्पटा
साडीपासून शिवलेल्या लेहेंग्यावर तुम्ही या पद्धतीने दुप्पटा ड्रेप करू शकता. यामध्ये तुम्हाला साडी नेसल्यासारखा दुप्पटा ड्रेप करता येईल.
लेहेंगा किंवा घागरा घातल्यानंतर त्याची ओढणी संपूर्ण पायांपर्यंत असते. त्यामुळे तुम्ही वेस्टर्न ड्रेप स्टाईलने लेहेंग्यावर दुपट्टा ड्रेप करू शकता. यामुळे तुम्हाला लग्नात बाहेर फिरताना किंवा डान्स करताना कोणतीही अडचण येणार नाही.
हल्ली केप ड्रेप पद्धतीने लग्नातील दुप्पटा ड्रेप केला जातो. त्यामुळे तुम्हाला जर हातांवर किंवा खांद्यावर दुप्पटा घेण्यास आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने दुप्पटा ड्रेप करू शकता.
काहींना लेहेंगा गुजराती पद्धतीने ड्रेप करायला खूप आवडतो. त्यामुळे तुम्ही उजव्या हातावर दुप्पटा ड्रेप करू शकता. यामध्ये तुमचा लुक सुंदर दिसेल.
अनेक मुलींना केप विथ बेल्ट या पद्धतीचा दुप्पटा लेहेंग्यावर किंवा घागऱ्यावर घालायला खूप आवडतो. यामध्ये तुम्ही उजव्या किंवा डाव्या खांद्यावर दुप्पटा घेऊन कंबरेवर बेल्ट लावू शकता.