सगळ्यांच्या आवडीचा कडधान्यातील पदार्थ म्हणजे काबुली चणे. घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी चण्यांची भाजी कायमच बनवली जाते. काबुली चणे चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा पौष्टीक आहेत. बऱ्याचदा वजन कमी करताना अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात कोणताही पदार्थ खात नाही. पण असे न करता नाश्त्यात चणे खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काबुली चण्यांपासून जेवणात आणि सकाळच्या नाश्त्यात कोणते पदार्थ बनवावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. (फोटो सौजन्य – istock)
काबुली चण्यांपासून सकाळच्या नाश्त्यात- जेवणात बनवा 'हे' चविष्ट आणि पौष्टीक पदार्थ

हॉटेलमध्ये गेल्यानंतर आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चणा कोळीवाडा. हा पदार्थ कायमच स्टार्टर्स म्हणून खाल्ला जातो. चणा कोळीवाडा हा पदार्थ काबुली चण्यांपासून बनवला जातो.

कांदा, टोमॅटो आणि वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेला छोले मसाला हा पदार्थ चपाती किंवा पुरीसोबत अतिशय सुंदर लागतो. यामुळे जेवणाची चव वाढते.

सकाळच्या नाश्त्यात काय खावे असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. अशावेळी नाश्त्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या, चणे आणि चाट मसाला टाकून बनवलेले सॅलड खाऊ शकता.

काबुली चणे, बटाटे, आले, हिरवी मिरची, आणि मसाले घालून बनवलेली टिक्की संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे., काबुली चण्याची टिक्की हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागते.

थंडीच्या दिवसांमध्ये सूप प्यायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. काबुली चणे आणि इतर भाज्या घालून बनवलेले सूप आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे.






