Fun Fact About Christmas : आज जगभरात ख्रिसमचा आनंद सुरु आहे. अनेकजण सांता क्लॉजची वाट पाहत आहेत. लहान मुलांचा तर हा आवडता सण असतो. कारण या दिवशी त्यांना लाल ड्रेस, पांढरी दाढी, लाल टोपी च्या वेशात सांता क्लॉज येतात आणि मुलांना त्यांच्या आवडीचे गिफ्ट मिळते. पण एक देश असा आहे जिथे आज नाही, तर ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो. आज आपण असा कोणात देश आहे आणि त्यामागाची परंपरा काय आहे हे जाणून घेणार आहे
Russia Christmas

तर रशिया असा देश आहे जिथे २५ डिसेंबरला नाही, तर ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा केला होता. यामागे एक मोठा इतिहास आहे. तसेच याची कथी देखील तितकीच मनोरंजक आहे

रशियामध्ये गेल्या अनेक दशकांपासून ७ जानेवारीला ख्रिसमससाजरा केला जातो. रशियातील संपूर्ण ख्रिश्चन समुदाय ज्युलियन कॅलेंडरचे पालन करते

१५८२ मध्ये युरोपने नवीन ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले होते, परंतु रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चने धार्मिक हेतूंसाठी जुन्या कॅलेंडरचाच वापर करण्याचा निर्णय घेतला

यामुळे रशिया गेल्या अनेक दशकांपासून ज्युलियन कॅलेंडरचेच पालन करतो. या कॅलेंडरमधील दिवस पवित्र मानले जातात

ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये फक्त १३ दिवसांचा फरक आहे






