हिवाळ्याचा ऋतू अनेक आजारांना आमंत्रण देतो. याकाळात सर्दी, खोकला असे आजर फार सामान्य आहेत. अनेकदा आजार दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जाण्याचा पर्याय निवडतो. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सामान्य आजार हे घरगुती उपायाच्या मदतीनेही दूर करता येऊ शकतात. चला खोकला दूर करण्यासाठी कोणत्या घरगुती उपायांची मदत घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
खोकला दूर करण्यासाठी काय करावं? हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

सर्दी आणि प्रदूषण दोन्हीमुळे खोकल्याची समस्या जाणवू लागते. यावर वेळीच कोणता उपाय केला नाही तर हा खोकला वाढू शकतो.

कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकला कमी होतो. यामुळे घसा खवखवणेही कमी होते. गुळण्या करताना जितक्या वेळ तुम्ही पाणी घशात ठेवू शकता तितक्या वेळ त्याला घशात ठेवण्याचा प्रयत्न करा.

जुन्या काळापासून खोकला दूर करण्यासाठी मधाचा वापर केला जात आहे. कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून घेतल्याने घसा शांत होतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

आल्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे खोकला आणि घसा खवखवण्यापासून आराम देतात. आल्याचा रस तयार करून त्यात चमचाभर मध मिसळा आणि याचे सेवन करा. चहामध्येही आल्याचे तुकडे टाकून चहाचे सेवन केले जाऊ शकते.

हळदीमध्येही दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे खोकला कमी करण्यास मदत करतात. अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधात मिसळा आणि याचे सेवन करा. यामुळे तुमचा घसा शांत होईल आणि खोकला नियंत्रित होण्यास मदत होईल.






