पुण्याच्या पुरंदर येथे वसलेले गणेश मंदिर हे आपल्या विलक्षण वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची खासियत म्हणजे, वर्षानुवर्षे हे जुने प्राचीन हिंदू मंदिर मशिदीप्रमाणे दिसते. गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर मशिदीप्रमाणे दिसू लागते. या मंदिरावर मुघल स्थापत्यकलेची छाप दिसून येते. या मंदिराला भेट देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येत असतात.
महाराष्ट्रातील एकमेव स्त्री रुपातील गणेश मंदिर, मशिदीप्रमाणे दिसते हे प्राचीन हिंदू मंदिर
हे अनाखे मंदिर महाराष्ट्रातील पुण्याच्या पुरंदर येथे वसले आहे. या मंदिराचे नाव भुलेश्वर मंदिर असे आहे. याला यवतेश्वर मंदिर असेही म्हटले जाते. हे महाराष्ट्रातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे गणेशाची स्त्री रुपातील मुर्ती पाहायला मिळते.
हे मंदिर मुळचा मंगलगड नावाचा किल्ला आहे. येथे औरंगजेबने आक्रमण करत येथील मुर्त्यांची तोडफाड केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुस्लीम शिल्पकारांनी याची पुनर्बांधणी केली.
या मंदिरात स्त्रीच्या वेशभूषेत असलेली गणेशाची सुंदर मुर्ती आहे. हा गणपती गणेश्वरी, लंबोदरी किंवा गणेशयानी नावाने ओळखला जातो.
imkage (14)
या मंदिराच्या गर्भगृहात एकूण पाच शिवलिंगे आहेत. ही शिवलिंगे खंदकात लपवलेली असल्याने फक्त प्रकाशात दिसू शकतात. हे विलक्षण मंदिर पुणे शहरापासून 54 किमी अंतरावर आहे.