प्रत्येक महिलेच्या कपाटात एक तरी बनारसी साडी असतेच. सणवार किंवा लग्न सोहळ्याच्या दिवसांमध्ये बनारसी साडी नेसली जाते. ही साडी नेसल्यानंतर रॉयल लुक दिसतो. रेशमी धाग्यांची चमक, सुंदर नक्षीकाम आणि पारंपरिकतेने सजलेली बनारसी साडी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण बऱ्याचदा बनारसी साडी कपाटामध्ये तशीच पडून राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बनारसी साडीपासून ड्रेस को-ऑर्ड सेट आणि अनारकली ड्रेस शिवण्यासाठी सुंदर डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईनचे ड्रेस तुम्ही पार्टी किंवा सणावाराच्या दिवशी अतिशय सुंदर दिसतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
जुन्या बनारसी साडीला द्या मॉर्डन टच! आईच्या जुन्या साडीपासून शिवा 'या' डिझाईनचे सुंदर ड्रेस
जुन्या बनारसी साडीपासून तुम्ही ट्रेंडिंग 'को-ऑर्ड सेट' शिवू शकता. याशिवाय बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे 'को-ऑर्ड सेट' उपलब्ध आहेत. 'को-ऑर्ड सेट' शिवण्यासाठी लाल किंवा गुलाबी रंगाच्या साडीचा वापर करावा.
बनारसी साडीपासून तुम्ही अनारकली ड्रेस शिवून घेऊ शकता. अनारकली ड्रेस लग्न किंवा इतर कोणत्याही सणाच्या दिवशी तुम्ही घालू शकता.
को-ऑर्ड सेट वर तुम्ही स्टाईल करताना स्टयलिश जॅकेटसुद्धा घालू शकता. यामुळे तुम्हाला अधिक मॉर्डन आणि एलिगंट लुक मिळेल.
काहींना अतिशय मॉर्डन कपडे घालायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही बनारसी साडीपासून या डिझाईनचा को-ऑर्ड सेट शिवून घेऊ शकता.
पारंपरिक बनारसी साडीवरील लुक आणखीनच स्टयलिश दिसण्यासाठी तुम्ही ड्रेस आणि सिगारेट पॅण्ट शिवून घेऊ शकता. हा ड्रेस तुम्ही घरातील कोणत्याही कार्यक्रमात घालू शकता.