संपूर्ण महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून पैठणी साडी जगभरात सगळीकडे ओळखली जाते. पारंपरिक पैठणी साडीची क्रेझ अजूनही सगळीकडे आहे. सर्वच महिलांना पैठणी साडी नेसायला खूप आवडते. पैठणी साडीमध्ये अनेक वेगवेगळे रंग, डिझाइन्स, कापड आहेत. महिला पैठणी साडी फारच हवीहवीशी वाटते. सणावाराच्या दिवसांमध्ये पैठणी साडी नेसल्यानंतर लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसतो. पण बऱ्याच वर्षांपासून ठेवणीमध्ये असलेली पैठणी साडी नेसून कंटाळा आल्यानंतर काहींना काहीं नवीन आणि युनिक ड्रेस घालण्याची इच्छा सगळ्यांचं होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पैठणी साडीपासून ड्रेस किंवा फ्रॉक - जंपसूट शिवण्यासाठी काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
पारंपरिक पैठणी साडीला द्या मॉर्डन टच!
जंपसूट किंवा कोर्डसेट ड्रेस हल्ली सोशल मीडियासह इतर सर्वच ठिकाणी ट्रेंड करत आहेत. नेहमीच नेसण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही साडीपासून या पद्धतीचा ड्रेस बनवून घेऊ शकता.
पैठणी साडी पासून घागरा - चोली शिवता येते. साडीच्या पदराचा ब्लाऊज आणि साडीच्या काठच्या कापडापासून सुंदरसा घागरा शिवून घेऊ शकता. लग्न समारंभात अनेक महिला आणि मुली घागरा किंवा लेहेंगा परिधान करतात.
पैठणीचा साडीचा वापर करून अनेक वेस्टर्न आऊटफिट्स सुद्धा शिवले जातात. त्यामध्ये तुम्ही पँट्स, धोती, वनपीस इत्यादी वेगवेगळे प्रकार शिवू शकता. धोती स्टाईल लुक कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा बाहेर जाताना घालू शकता.
जुन्या किंवा ठेवणीतील पैठणी साडीपासून तुम्ही सुंदरसा गाऊन शिवू शकता. सणसमारंभ किंवा लग्नकार्यात पैठणी साडीपासून शिवलेले गाऊन अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसतात. साडी नेसल्यानंतर काहींना साडी नेसून वावरताना खूप अवघड जाते. अशावेळी तुम्ही साडीपासून गाऊन शिवू शकता.
पैठणी साडी पदर, काठ आणि दोन रंगाची शेड्स असलेल्या साडीपासून तुम्ही ड्रेसवर पॅचवर्क सुद्धा करू शकता. ड्रेसवर पॅचवर्क केल्यानंतर तुम्ही घातलेला ड्रेस आणखीनच सुंदर दिसेल.