हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धन, संपत्ती, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीची अधिष्ठात्री देवी मानले जाते. घरात लक्ष्मीचा वास असावा यासाठी स्वच्छता, नियम आणि चांगल्या सवयींवर भर दिला जातो. पण काही चुकीच्या सवयींमुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात दरिद्रतेचे आगमन होऊ शकते. तुम्हालाही या सवयी असल्यास त्या वेळीच टाळणे फायद्याचे ठरेल. (फोटो सौजन्य: Pinterest)
या 5 सवयींमुळे देवी लक्ष्मी होते नाराज, चुकूनही या चुका करू नका नाहीतर कधीही ठेवणार नाही घरात पाऊल
घर, देवघर किंवा स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवल्यास लक्ष्मी नाराज होते. विशेषतः कचराकुंडी भरलेली ठेवणे किंवा भांडी न धुता ठेवणे टाळावे.
संध्याकाळी झाडू मारल्यास घरातील धन बाहेर जाते असे मानले जाते. त्यामुळे ही सवय टाळावी.
अन्न वाया घालवणे हे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचा अपमान मानले जाते. शिल्लक अन्न फेकणे किंवा नासाडी करणे टाळावे.
घरातील सदस्यांमध्ये भांडणे, वाईट शब्द वापरणे किंवा नकारात्मक बोलणे यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि लक्ष्मी रुष्ट होते.
रात्री झोपताना केस उघडे ठेवणे किंवा विखुरलेले केस ठेवणे हे दरिद्रतेचे लक्षण मानले जाते. म्हणून केस बांधून झोपण्याची सवय चांगली मानली जाते.