Grand Central Terminal: रेल्वे स्थानक हे असे ठिकाण आहे जिथे प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी भेट देतो. मात्र, जगातील सर्वात मोठा आणि राजवाड्यासारखा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. हे रेल्वे स्थानक जगातील सर्वात मोठे आणि सुंदर रेल्वे स्थानक आहे. हे सुंदर रेल्वे स्थानक पाहण्यासाठी दुरून लोकं येत असतात. लोक ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातात, पण या ठिकाणी सौंदर्य पाहण्यासाठी आणि फिरण्यासाठी लोकं रेल्वे स्थानकावर जातात. या रेल्वे स्थानाकवर गेल्यावर तुम्हाला एखाद्या राजवाड्याचा भास नक्कीच होईल. आता आम्ही तुम्हाला ज्या रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत, त्या रेल्वे स्टेशनमध्ये एकूण 44 प्लॅटफॉर्म आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
रेल्वे स्टेशन आहे की राजवाडा! सौंदर्य असं की पाहतच राहाल, एकदा तरी नक्की भेट द्या
बहुतेक लोक ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातात. पण, ही बातमी वाचून तुम्हाला रेल्वे स्टेशनवर फक्त फिरायला जावं असं वाटेल.
आम्ही ग्रँड सेंट्रल टर्मिनलबद्दल बोलत आहोत जे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे. या रेल्वे स्थानकावर एकाच वेळी 44 गाड्या उभ्या राहू शकतात. हे रेल्वे स्टेशन 1903 ते 1913 दरम्यान बांधण्यात आले होते.
ग्रँड सेंट्रल टर्मिनल रेल्वे स्टेशनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. या रेल्वे स्थानकाच्या उभारणीला 10 वर्षे लागली यावरून तुम्ही या रेल्वे स्थानकाच्या भव्यतेची कल्पना करू शकता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दररोज 1,25,000 प्रवासी येथून प्रवास करतात. दररोज सरासरी 660 मेट्रो नॉर्थ गाड्या येथून जातात, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की दरवर्षी 19 हजारांहून अधिक वस्तू येथे हरवल्या जातात.
इथे आल्यावर एखाद्या महालात शिरल्याचा भास होईल. 48 एकरपेक्षा जास्त परिसरात पसरलेल्या या रेल्वे स्थानकाच्या सौंदर्याच्या तुलनेत राजवाडेही फिके पडले आहेत.
या रेल्वे स्थानकावर अनेक हॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. परिस्थिती अशी आहे की आता लोक ट्रेन पकडण्यापेक्षा हे रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी जास्त प्रवास करत आहेत.