दिशा परमार तिच्या अभिनयासाठी चर्चेत तर असतेच त्याचबरोबर तिचे अप्रतिम सौंदर्य या चर्चेला खास करतात. दिशा नेहमीच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर जोडलेली असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांशी तिचे क्षण इंस्टाग्राम पोस्ट किंवा स्टोरीच्या माध्यमातून शेअर करत असते. अशात दिशाने चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन दिशा दिली आहे.
दिशाचे नवीन फोटोस पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री दिशा परमारने तिच्या @dishaparmar या इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने तर सोशल मीडियावर धुरळाच केला आहे.
काळ्या रंगाच्या या साडीत दिशा फार आकर्षक दिसत आहे. काळी साडी त्यात डोळ्यांना गडद काळे काजळ त्यात दिशाचे निखळ सौंदर्य, सौंदर्याचा उत्तम नमुना तिने सादर केला आहे.
तिचा हा पोस्ट चाहत्यांच्या काळजात इतका उतरला आहे की त्यांना कौतुक केल्याशिवाय राहवले नाही आहे. काळ्या आऊटफिटमध्ये तिच्या रूपाने कहरच केले असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
तिचा रूप नेटकऱ्यांच्या हृदयाला इतका भिडला आहे कि अवघ्या काही तासातच पोस्टला 41,106 नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.
दिशाने पोस्टखाली कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिने फोटोग्राफी जय दोडियाने केले असल्याचे नमूद केले आहे.