उत्तरप्रदेशातील दौराला भागात विचित्र घटना, न्यूड गँगचा वावर वाढला (फोटो सौजन्य - iStock - प्रातिनिधिक आहेत)
उत्तर प्रदेशातील मेरठमधील दौराला भागात न्यूड गँगची दहशत दिसून येत आहे. या न्यूड गँगचे लक्ष्य महिला आहेत. ही टोळी निर्जन भागात दिसणाऱ्या महिलांना लक्ष्य करताना दिसून आली आहे. अनेक महिलांना शेतात ओढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु महिलांच्या धाडसामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्या न्यूड गँगचा बळी होण्यापासून वाचल्या. दौराला परिसरातील महिलांमध्ये या न्यूड गँगने दहशत पसरवली आहे. NDTV इंडियाने दिलेल्या माहितीनुसार सध्या या गँगचा शोध चालू आहे.
पोलिसांनी कोणताही संशयित पकडला नाही
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि खबरदारी म्हणून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु आतापर्यंत अशा प्रकारचा कोणताही संशयित पोलिसांना सापडलेला नाही. तथापि, पोलिसांनी ड्रोनच्या मदतीनेही लक्ष ठेवले आहे आणि गुप्तचर विभागही पूर्णपणे सतर्क आहे. दरम्यान महिलेला एकटी घरी येत असताना दोन तरूणांनी शेतात खेचून नेण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने आरडाओरडा करून धाडस दाखवले आणि त्यांच्या तावडीतून सुटली.
‘दोघांनीही कपडे घातले नव्हते..’
माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शेताला सर्व बाजूंनी वेढा घातला. कुटुंबातील सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी महिलेला दोन्ही तरुण कसे दिसतात याबद्दल विचारले असता तिने सांगितले की दोघांनीही कपडे घातले नव्हते. यामुळे गावकरी संतापले. न्यूड गँगची ही चौथी घटना असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे आणि माहिती पोलिसांना दिली आहे.
पोलिसांचा अलर्ट मोड
दुसरीकडे, ‘न्यूज गँग’च्या दहशतीची माहिती मिळताच, पोलिसही सतर्क झाले आहेत. दौराला पोलिस ठाण्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि अनेक शेतात शोध घेतला आहे. त्यांनी ड्रोनच्या सहाय्याने देखरेख केली आणि आकाशातून नग्न टोळीतील सदस्यांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शनिवारी ड्रोनच्या मदतीने अनेक तास शेतात शोध मोहीम राबवण्यात आली.
त्यानंतर ADG मेरठ झोन भानू भास्कर आणि SSP घटनास्थळी पोहोचले अशी माहिती देण्यात आली आहे. पोलिस आणि ग्रामस्थांनी अनेक शेतांचीही तपासणी केली. इतकेच नाही तर जवळील सीसीटीव्ही कॅमेरे देखील शोधण्यात आले. ग्रामस्थांनी अनेक रस्त्यांवर पहारा देऊन बारकाईने लक्ष ठेवले. पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशीही केली आहे. ड्रोनच्या मदतीने प्रत्येक ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत मात्र या टोळीचा कोणताही सदस्य पकडला गेलेला नाही.