Team India (Photo Credit- X)
Asia Cup 2025 All Squads: आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा टी-20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. या 8 संघांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्यामुळे या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धकांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्या हातात आहे.
आतापर्यंत आशिया कपचे 16 सीझन झाले आहेत आणि यात भारताचे वर्चस्व दिसून आले आहे. भारताने सर्वाधिक 8 वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. आगामी आशिया कपसाठी सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
स्पर्धेत सहभागी होणारे संघ
आशिया कप 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि अबू धाबी येथील शेख जायेद स्टेडियममध्ये खेळले जातील.
दोन गटांमध्ये संघांची विभागणी
हे देखील वाचा: Asia cup 2025 : पाकिस्तान संघात आनंदांची लहर; लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ‘त्या’ खेळाडूला दिलासा
टी-20 आशिया कपसाठी सर्व संघांची संपूर्ण स्क्वॉड:
1. भारत
2. पाकिस्तान
3. अफगाणिस्तान
4. बांगलादेश
5. हाँगकाँग
6. ओमान
7. यूएई
8. श्रीलंका
फायनल सामना 28 सप्टेंबर रोजी सुपर-4 च्या गुणतालिकेत (पॉइंट्स टेबल) टॉप-2 मध्ये असलेल्या संघांमध्ये खेळवला जाईल.