अजिंक्य राहणे(फोटो-सोशल मीडिया)
Ajinkya Rahane believes these five players are important in the Asia Cup : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा टी 20 स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन यूएई येथे करण्यात आले आहे. या स्पर्धसतही भारतीय संघ आधीच घोषित करण्यात आला आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारत १० सप्टेंबररोजी यूएईविरुद्ध सामना खेळून आपली मोहीमेला सुरुवात करणार आहे. तर १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला होणार आहे. आता दुबई येथे होणाऱ्या आशिया कप २०२५ बाबत माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने मोठे विधान केले आहे. त्याने पाच भारतीय खेळाडूंची नावे सांगितली आहेत ज्यांच्यावर या स्पर्धेत भारताच्या अपेक्षा असणार आहेत.
हेही वाचा : ‘SA20 मध्ये भारतीय खेळाडूंसाठी बोली नाहीच…’ लीग कमिशनर ग्रॅमी स्मिथ केला मोठा खुलासा, कारणही सांगितले..
अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला संघाचा सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू म्हणून उल्लेख केला आहे. तसेच त्याला त्याचा निर्भय खेळ हा भारताच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे असे अजिंक्यने सांगितले आहे. तसेच अजिंक्यने हार्दिक पंड्याची अष्टपैलू भूमिका देखील भारतासाठी महत्त्वाची मानली आहे. तसेच पंड्याची गोलंदाजी देखील महत्वाची भूमिका बाजावेल असे म्हटले आहे. अजिंक्य रहाणेने फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला “कमी दर्जाचा खेळाडू” म्हणून उल्लेख करत दुबईच्या खेळपट्ट्यांवर त्यांचा अष्टपैलू खेळ भारतासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचे म्हटले आहे.
तसेच पुढे अजिंक्य राहणेने वेगवान गोलंदाजीमध्ये त्याने जसप्रीत बुमराहला खरा सामना जिंकणारा खेळाडू म्हटले आहे. अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, अर्शदीप सिंगला बूमराहचा परिपूर्ण साथीदार म्हणून नाव पुढे केले आहे. ज्याचा स्विंग आणि यॉर्कर निर्णायक ठरण्याची शक्यता राहणेने वर्तवली आहे. रहाणेच्यामते, या पाच खेळाडूंची कामगिरी आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये भारताचा विजय निश्चित करणार आहे.
हेही वाचा : ‘Preity Zinta मुळे प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी..’, IPL मधील ‘या’ वेगवान गोलंदाजाने केला धक्कादायक खुलासा…
पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन संघात आयपीएल २०२५ चा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात राजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पंजाबचा पराभव करून आयपीएलचे विजेतपद जिंकले होते. या हंगामात श्रेयस अय्यरच्या शानदार नेतृत्वात पंजाब किंग्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु अंतिम विजेतेपद मात्र मिळवता आले नाही. दरम्यान प्रीति झिंटा मात्र आपल्या खेळाडूंचे कौतुक केले होते. क्रिकेटपटू संदीप शर्मा याने आता अशातच प्रीति झिंटाबाबत एक खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, प्रीति झिंटामुळे प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी बदलण्यात आला होता.