Nissan ची Spinny सोबत पार्टनरशिप!
निसान मोटर इंडिया प्रा. लि. (NMIPL) ने भारतातील आघाडीच्या फुल-स्टॅक वापरलेल्या कार प्लॅटफॉर्म स्पिनीसोबत धोरणात्मक पार्टनरशिप केली आहे. यामुळे स्पिनी निसानच्या भारतातील सर्व डीलरशिप्ससाठी ‘प्रिफर्ड एक्सचेंज पार्टनर प्लॅटफॉर्म’ म्हणून काम करेल. ऑटोमोबाईल OEM आणि राष्ट्रीय स्तरावरील वापरलेल्या कार अॅग्रीगेटर यांच्यातील ही पहिलीच भागीदारी असून, ग्राहकांना अधिक चांगले एक्सचेंज फायदे देण्यासोबतच डीलर भागीदारांसाठी नवीन व्यवसाय संधी निर्माण करणार आहे.
ग्राहक-केंद्रित या पुढाकाराचा उद्देश निसान मोटर इंडियाच्या डीलरशिप नेटवर्कची कामगिरी आणि नफा वाढवणे हा आहे. या भागीदारीअंतर्गत, जे ग्राहक स्पिनीच्या माध्यमातून – निसान डीलरशिपवर किंवा थेट स्पिनीच्या प्लॅटफॉर्मवरून – आपली जुनी वाहने एक्सचेंज करतील, त्यांना नवीन निसान वाहन खरेदी करताना विशेष एक्सचेंज फायदे मिळतील.
इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…
स्पिनीची वाहन मूल्यांकन टीम ग्राहकांच्या मागणीनुसार निसान डीलरशिपवर उपस्थित राहील. त्यामुळे वाहन मूल्यांकनाची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि वेळेवर पार पडेल. एक्सचेंज क्लेम प्रक्रियाही अधिक सुलभ करण्यात आली आहे. स्पिनीने जारी केलेले ‘बायिंग लेटर’ हे वैध एक्सचेंज पुरावा म्हणून स्वीकारले जाईल, ज्यामुळे ग्राहकांना RC ट्रान्सफर डॉक्युमेंटेशनची काळजी घ्यावी लागणार नाही.
या पार्टनरशिपमुळे निसान डीलर नेटवर्कला वापरलेल्या कारची इन्व्हेंटरी लिक्विडेट करण्यासाठी आणि संयुक्त मार्केटिंग मोहिमांद्वारे अधिक लीड्स निर्माण करण्यासाठी नवी संधी मिळेल. स्पिनी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर निसानच्या एक्सचेंज ऑफर्सला प्रमुख स्थान देईल, तर निसान आपल्या प्रचार मोहिमांमध्ये स्पिनी ब्रँडिंगचा समावेश करेल.
या निमित्ताने निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्सा म्हणाले, “निसान मोटर इंडियामध्ये आम्ही आमच्या ग्राहक आणि डीलर पार्टनरशिपसाठी अधिक मूल्य निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत. स्पिनीसोबतची भागीदारी आमच्या वाहन एक्सचेंज इकोसिस्टमला बळकटी देण्यासाठी, ग्राहक अनुभव उंचावण्यासाठी आणि डीलरशिपच्या वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.”
स्पिनीचे संस्थापक आणि CEO नीराज सिंग म्हणाले, “निसानसोबतची आमची भागीदारी भारतात कार मालकी आणि अपग्रेड अनुभव नव्याने परिभाषित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही विश्वास, पारदर्शकता आणि सुलभतेवर भर देतो, आणि OEMsसोबत मिळून असे इकोसिस्टम निर्माण करतो जिथे प्रत्येक ग्राहक आत्मविश्वासाने व्यवहार करू शकेल.”
दरम्यान, निसान मोटर इंडियाने अलीकडेच बहुप्रतीक्षित निसान मॅग्नाइट KURO स्पेशल एडिशन लाँच केली आहे. दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹८.३० लाखांपासून सुरू होणारी ही प्रीमियम SUV ‘Boldest Black’ डिझाइन तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. आकर्षक ब्लॅक एक्सटीरियर, प्रीमियम इंटीरियर थीम आणि जपानी डिझाइन एलिमेंट्समुळे ती ग्राहकांना भुरळ घालते.
महत्त्वाचे म्हणजे, नवीन निसान मॅग्नाइटला Global NCAP कडून ५-स्टार ओव्हरऑल पॅसेंजर सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ४०+ स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, ६ एअरबॅग्स, ABS+EBD, ESC, TCS, HSA, TPMS आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चर यामुळे ती भारतातील आणि दक्षिण आफ्रिकेमधील सर्वात सुरक्षित SUV पैकी एक ठरते. आज निसान मॅग्नाइट ६५+ देशांमध्ये उपलब्ध आहे आणि कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये नवा बेंचमार्क प्रस्थापित करत आहे.