भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात जाणून घेऊया सविस्तर.
Pumpkin Seeds

रोजच्या आहारात कमीत कमी २ चमचा भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकाल. निरोगी राहण्यासाठी आहारात भाज्या आणि फळांचे सेवन करणे आवश्यक आहे.

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे आहारात सेवन करा. यामध्ये फायबर असल्याने शरीरातील चरबी निरोगी राहते. तसेच कोलेस्टेरॉल कमी होऊन मॅग्नेशियम रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवतो.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बिया किंवा भाजीचे सेवन करावे. बियाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.

भोपळ्याच्या बियांचा वापर जेवणाच्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. दह्यामध्ये टाकून तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता. मखाना बर्फी, सिंघाऱ्याच्या पिठाची बर्फी, बेसन बर्फी इत्यादी अनेक पदार्थ बनवताना भोपळ्याच्या बियांचा वापर केला जातो.

भोळ्याच्या बियांपासून तुम्ही चटणी देखील बनवू शकता. यासाठी भोळ्याच्या बिया हलक्या तळून घ्या. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, लसूण बारीक करून घ्या. यामध्ये लिंबाचा रस टाकून मिक्स करा. अशा पद्धतीने तयार करा भोपळ्याची चटणी.






