आयुर्वेदिक औषधांमध्ये शतावरील विशेष महत्व आहे. शतावरीचा वापर कॅप्सूल, पावडर किंवा चहाच्या स्वरूपात सुद्धा केला जातो. तसेच यामध्ये फायटोस्ट्रोजेन्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येते. शतावरीचे सेवन केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. महिलांना जाणवणाऱ्या सर्व शारीरिक आणि मानसिक समस्यांवर शतावरी गुणकारी आहे.चला तर जाणून घेऊया शतावरी खाल्याने आरोग्याला होणारे प्रभावी फायदे.(फोटो सौजन्य-istock)
महिलांच्या आरोग्यासाठी गुणकारी शतावरी

शतवारीमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स आढळून येते, ज्यामुळे शरीरातील इस्ट्रोजेन पातळी संतुलित राहते. शिवाय हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो.

मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी शतावरीचे सेवन करावे. शतावरी पावडर तुम्ही दुधात मिक्स करून नियमित रात्री झोपताना पिऊ शकता.

अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या शतवारीमध्ये अँटी-डिप्रेसंट गुणधर्म सुद्धा आढळून येतात. यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी रोजच्या आहारात नियमित शतावरी किंवा अश्वगंधा पावडरचे सेवन करावे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही शतावरीचे सेवन करू शकता. यामुळे पचनसंबंधित समस्या दूर होतात.






