गणपती बाप्पाचे आवडते फुल म्हणून जास्वंदीच्या फुलाची ओळख आहे. हे फुल केवळ दिसायलाच सुंदर नाहीतर शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. जास्वंदीच्या फुलात असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जास्वंदीच्या फुलाचे पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. याशिवाय त्वचेचा रंग सुधारण्यासाठी, मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी या फुलांचे चहा बनवून प्यायला जातो. चला तर जाणून घेऊया जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली जास्वंदीची फुले शरीरासाठी ठरतील गुणकारी

जास्वंदीच्या फुलांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत होते.

शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी जास्वंदी गुणकारी ठरते. यामुळे केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होऊन केसांच्या समस्यांपासून आराम मिळतो.

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही आणि आरोग्य सुधारते.

गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे पाणी प्रभावी आहे. त्यामुळे नियमित सकाळी जास्वंदीच्या फुलांचा चहा प्यावा.






