हिरव्या पालेभाज्या या अधिकतर फार स्वस्त असतात, असा आपला समज आहे. आपण बाजारात भाज्या घ्यायला जातो तेव्हा त्या १० किंवा २० या किमतीला विकत मिळतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? जगात एक अशीही भाजी आहे जिची किंमत सोन्याच्या भावालाही लाजवेल. या भाजीची किंमत ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. जगातील सर्वात महागड्या या भाजीचे नाव काय आहे आणि ती कुठे मिळते ते जाणून घेऊया.
ही आहे जगातील सर्वात महाग भाजी, याची किंमत आहे सोन्याहून अधिक; किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल
या भाजीचे नाव 'हॉप शूट्स' असे आहे. ही भाजी युरोपीय देशांमध्ये फार लोकप्रिय आहे. जगातील सर्वात महागड्या भाजीपाल्यांमध्ये या भाजीचे नाव अग्रस्ठानी आहे
आता प्रश्न असा आहे की ही सर्वात महाग भाजी का आहे? याचे उत्तर आहे, त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे... यातील खास आणि औषधी गुणधर्म या भाजीला इतर भाजींहून वेगळे बनवतात
भाजीच्या किमतीबद्दल बोलणे केले तर, ही भाजी प्रति किलो 85,000 रुपयांना मिळते. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा दरही यापेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे, या भाजीची लागवड भारतात केली जात नाही
एका अहवालानुसार, हाॅप शूट भाजी इतकी महाग असण्याचे कारण म्हणजे, याच्या लागवडीसाठी लागणारी मेहनत. गुणवत्तेनुसार, या भाजीची किंमत बदलत जाते. यासोबतच मुख्य म्हणजे, ही भाजी बाजारात सहज उपलब्ध होत नाही
या भाजीच्या फुलांना 'हॉप कोन्स' असे म्हटले जाते. याची फुले बिअर बनवण्यासाठी वापरली जातात. तर याच्या फांद्यांचेही सेवन केले जाते. याचाच अर्थ असा की, ही भाजी घेणं काही साधी गोष्ट नाही आणि सर्वसामान्यांना परवडण्याजोगीही नाही