महाभारत संपत आलं. युद्ध झालं. पांडवांनी त्यांचं राज्य पुन्हा उभारलं. अश्वमेध यज्ञात अर्जुनाने आसपासच्या मोठमोठ्या राजांशी द्वंद्वयुद्ध करून सगळ्यांना धारातीर्थी पडले. अनेक राज्य जिंकून हस्तिनापूर पुन्हा नव्याने सावरू लागला. ३६ वर्षांच्या राज्यांनंतर युद्धिष्ठिराने स्वर्गस्थ होण्याचे ठरवले. पाचही पांडव आणि द्रौपदी आता स्वर्गस्थ होणार होते आणि त्यांच्याकडे हस्तिनापुराचा उत्तराधिकारी म्हणून परीक्षित हाच होता.
पांडवपर्व कसे संपले? (फोटो सौजन्य - Social Media)

त्यांनी परीक्षिताला अधिपती बनवून ते स्वर्गाकडे जाणाऱ्या विमानाच्या शोधात हिमालयाच्या वाटेने निघाले. पण स्वर्गस्थ होणे सोपे नाही. दरम्यान, त्यांच्या दुर्गुणांमुळे त्यातील एक एक व्यक्ती जमिनीवर कोसळत होता, असे युद्धिष्ठिराचे म्हणणे होते कारण युद्धिष्ठिर सोडून सगळेच कोसळले.

त्याचे म्हणणे होते की द्रौपदी कोसळली कारण ती अर्जुनासाठी पक्षपाती होती. सहदेव कोसळला कारण त्याला त्याच्या बुद्धीचा अहंकार होता. नकुल कोसळला कारण त्याला त्याच्या रूपाचा अभिमान होता.

अर्जुन कोसळला कारण त्यालाही त्याच्या धनुर्धर असण्याचा अभिमान होताच आणि भीम तो तर नुसता खायचा आणि उगाच बळ दाखवयाचा.

यावरून कळते की युद्धिष्ठिराच्या मनात इतर पांडवांशिवाय किती ईर्ष्या होती. सगळे कोसळत जात होते आणि त्यांच्यातच नियम ठरला होता की कुणीही कोसळला तरी त्याला तिथेच टाकून स्वतः पुढे जायचे.

शेवटी, युद्धस्थिर एकटाच टिकला. हिमालयात इंद्र स्वतः त्याचा रथ घेऊन आला आणि युद्धिष्ठिराला स्वर्गात घेऊन गेला. आणि येथेच पांडवपर्व संपले.






