ट्रेन ही एक अशी सुविधा आहे जी कमी वेळेत जास्तीचे अंतर कापते. यासाठी प्रवाशांना अधिक पैसेही घालवावे लागत नाही आणि म्हणूनच अधिकतर लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. सध्या डेस्टिनेशन वेडिंगचे प्रमाण फार वाढले आहे. यासाठी सर्व मंडळींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणे जावे लागते. भारतात रेल्वेचे सर्वात मोठे जाळे आहे अशात तुम्हीही डेस्टिनेशन वेडिंगचा विचार केला असेल तर नातेवाइकांना निश्चित स्थानापर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही ट्रेनचा अख्खा कोच बुक करू शकता.
लग्नासाठी ट्रेनचा अख्खा कोच कसा बुक करायचा? पैसेही कमी आणि प्रोसेसही सोपी; आजच जाणून घ्या
IRCTC चे फुल टॅरिफिक रेट किंवा एफटीआर सर्व्हिस यात तुमची मदत करेल. www.ftr.irctc.co.in या वेब साईटवरून तुम्ही ट्रेनचा संपूर्ण कोच बुक करू शकता. तुम्ही इथून व्यक्ती फर्स्ट क्लास, एसी 2-टियर, एसी 3-टियर, एसी 2 कम 3 टियर, एसी चेयर कार, स्लीपर, एसी सलून, सेकंड सीटिंग सारखे कोच आरामात बुक करू शकता
ट्रेनचा संपूर्ण कोच बुक करण्यासाठी तुम्हाला www.ftr.irctc.co.in वेब साईटवर जाऊन तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. आयरसीटीसीचा आयडी आणि पासवर्ड हा FTR च्या वेबसाईटवर काम करत नाही. म्हणून तुम्हाला नवा आयडी आणि पासवर्ड बनवावा लागेल
यासाठी www.ftr.irctc.co.in वर जाऊन लॉग इन करा. यानंतर संपूर्ण ट्रेन किंवा कोच बुक करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. इथे तुम्हाला तुम्हाला प्रवासाची तारीख, प्रवाशांची संख्या आणि इतर महत्त्वाची माहिती भरावी लागेल
सर्व डेटल्स भरल्यानांतर पुढे पेमेंटचा पर्याय येईल. पैसे भरल्यानंतर संपूर्ण कोच बुक केले जाईल. ही प्रक्रिया अतिशय जलद आणि सोपी आहे. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही लग्नासाठी ट्रेन कोच बुक करताना सर्व प्रवाशांचे डिटेल्स देण्याची आवश्यकता नसते फक्त जो व्यक्ती पेमेंट करणार आहे त्याचे डेटल्स भरावे लागतील, म्हणजेच संपूर्ण बुकिंग फक्त एकाच व्यक्तीच्या नावावर असेल
तुम्ही ही प्रक्रिया ऑफलाइन देखील करू शकता. यासाठी कोणत्याही प्रमुख रेल्वे स्थानकावर जा आणि मुख्य आरक्षण अधिकाऱ्याला विनंती अर्ज भरून द्या. नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान प्रवास करण्यासाठी एसी कोचची रजिस्ट्रेशन फी 50,000 रुपये आहे
संपूर्ण कोच बुक करण्यासाठी तुम्हाला 6 महिन्यांपूर्वी किंवा किमान 30 दिवसांआधी कोचची बुकिंग करावी लागेल